महायुवा संमेलन २०२३ - नागपूर

प.पू.श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेत महाराष्ट्र युवाशक्ती द्वारे नागपूर अकॅडमी येथे डिसेंबर 2023 दरम्यान 3 दिवसीय “महा युवा संमेलन” आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या सहज योग विकासासाठी युवाशक्ती द्वारे सहजयोग स्वयंसेवक घडविण्यासाठी 5000 युवा वर्गाचे हे महा संमेलन आयोजित केले जात आहे. 18 ते 25 वयोगटातील युवाशक्ती आणि पूर्वी युवाशक्ती मध्ये कार्यरत आणि आत्ता 25 ते 45 वयोगटातील सहज योगी अश्या दोन पिढ्यांचे हे महा युवा संमेलन आयोजित केले जात आहे.

  • युवाशक्ती ची जीवनशैली
  • करियर मार्गदर्शन
  • सहज योगात स्वयंसेवक म्हणून जबाबदारी
  • 80 ते 90 च्या दशकातील युवा शक्ती सोबत चर्चा सत्र
  • युवा संगीत महोत्सव

अश्या विविध विषयावर मार्गदर्शन, चर्चा सत्र आणि आनंद सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.

ऑनलाइन नोंदणी काही दिवसात सुरू होईल